coronavirus updates in maharashtra: राज्यात करोनाचा विस्फोट; आज ८ हजार रुग्णांचे निदान, तर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४५४ - latur saptrang

Breaking

Friday, December 31, 2021

coronavirus updates in maharashtra: राज्यात करोनाचा विस्फोट; आज ८ हजार रुग्णांचे निदान, तर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या ४५४



 मुंबईः राज्यात गेल्या २४ तासांत ८ हजार ०६७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ८ करोना बाधित रुग्णांचे निधन झाले आहे. आरोग्य विभागाने आकडेवारी जारी केली आहे.


राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या आणि ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथे करोना रुग्ण संक्रमण दर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध कठोर केले आहेत. तसंच, लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ओमिक्रॉन रुग्णांची संख्याही राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्यात एकूण ४५४ ओमिक्रॉन रुग्ण आहेत.

आज राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ८ हजार ०६७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर, आज दिवसभरात ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९०,१०,१५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,७८,८२१ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आज दिवसभरात १ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४६% एवढे झाले आहे. सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, आज राज्यात ४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत. वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले.

No comments:

Post a Comment