3 लाख 37 हजार नवे कोरोना रुग्ण; 488 रुग्णांचा मृत्यू - latur saptrang

Breaking

Saturday, January 22, 2022

3 लाख 37 हजार नवे कोरोना रुग्ण; 488 रुग्णांचा मृत्यू



 देशात सध्या कोरोना रुग्णांची (Covid19) आकडेवारी वाढत जात असून, कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता आज समोर आलेल्या आकडेवारीमधून देखील असंच चित्र निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशात 3,37,704 नवे रुग्ण (Covid19 New Cases) आढळून आले आहेत. तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे. तरी सकारात्मक बाब अशी की, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमी रुग्ण आढळून आले आहेत. मात्र असं असलं तरी एकुण आलेखाचा विचार केल्यास रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

देशात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 2,42,676 एवढी आहे. राज्यात सध्या 21,13,365 सक्रिय रुग्ण आहेत. तर आता देशात कोरोनाबाधित होण्याचा दर 17.22 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात सध्या 10,050 ओमिक्रॉन रुग्ण झाले आहेत. त्यामुळे यामध्ये 3.69 टक्क्यांनी यामध्ये वाढ झाली आहे.  कोरोना संसर्गाचा परिणाम मुलांपेक्षा प्रौढांवर जास्त होतो. मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त नाही किंवा त्यांच्यात गंभीर लक्षणे दिसून येत नाहीत असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील 197 रुग्णांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यांना कोविड-19 च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


No comments:

Post a Comment