Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला - latur saptrang

Breaking

Wednesday, January 26, 2022

Abhijeet Bichukale : असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला; अभिजीत बिचुकले सलमान खानवर भडकला



 Abhijeet Bichukale : सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉसमधून (Bigg Boss 15) अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नुकताच बाहेर पडला आहे. अशातच कॉन्ट्राव्हर्सी किंग बिचुकलेने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. सलमानला कोणी मोठं झालेलं बघवत नाही, त्याचा 20 वर्षांचा इतिहास बघा, असे शंभर सलमान दारात उभे करेन माझी गल्ली झाडायला असं म्हणत बिचुकलेने सलमान खानवर निशाणा साधला आहे. 

अभिजीत बिचुकले म्हणाला,"बिग बॉसच्या घरात मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. सलमानने माझ्यावर व्यक्त केलेला राग न शोभणारा आहे. सलमानने 14 शो चालवले. त्याला वाटतं की तो शो चालवतो, मात्र हा 15 वा शो मी चालवला, आणि इथे तो कमी पडला. त्याने जी भाषा वापरली ती आजपर्यंत मला कोणी वापरली नाही. पिंजऱ्यात वाघ आहे म्हणून तो हंटर फिरवत होता, आता वाघ पिंजऱ्यामधून बाहेर आला आहे. सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईन की मी काय आहे".

अभिजीत बिचुकले पुढे म्हणाला,"सलमान खान अजून अंड्यात आहे. त्याला अजून अंड्यातून बाहेर यायचं आहे. ज्या जनतेनं मला प्रेम दिलं त्या जनतेच्या जिवावर सलमान उड्या मारतो. मी या शोमधून बाहेर पडणारच होतो. मला अशा शोची गरज नाही. मला त्यांनी थांबण्याची विनंती केली. त्यामुळे मी थांबलो. त्यांना माझी गरज होती, त्यांनी बोलावलं म्हणून मी बिग बॉसमध्ये गेलो".

अभिजीत बिचुकले याआधी मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. आता तो हिंदी बिग बॉसमधून बाहेर पडला असून त्याने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

No comments:

Post a Comment