Pushpa : The Rise : प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील 'पुष्पा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पण पुष्पा या चित्रपटासाठी रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या आधी काही कलाकारांना ऑफर देण्यात आली होती. पण या कलाकारांनी या सुपर हिट चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
विजय सेतुपती (Vijay Sethupathi)
दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीला पुष्पा चित्रपटातील खलनायकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र विजय सेतुपतीनं या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला. त्यानंतर ही भूमिका अभिनेता फहाद फासिलने साकारली.
महेश बाबू (Mahesh Babu)
टॉलिवूडचा प्रिन्स म्हणजेच महेश बाबूला पुष्पा चित्रपटातील प्रमुख भूमिका दिग्दर्शक सुकुमार यांनी ऑफर केली. मात्र चित्रपटाचे कथानक महेश बाबूच्या पसंतीस पडले नाही. त्यामुळे त्याने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
दिशा पटनी (Disha Patani)
दिशा पटानीला पुष्पा चित्रपटातील आयटम साँगची ऑफर देण्यात आली. या चित्रपटातील आयटम साँगसाठी दिशानं 1.5 कोटी रूपये मानधन मागितले. पण नंतर फिल्म मेकर्सनं समंथाला या आयटम साँगसाठी कास्ट केलं.
नोरा फतेही (Nora Fatehi)
पुष्पा चित्रपटातील आयटम साँगसाठी चित्रपट निर्मात्यांनी नोरा फतेहीला देखील कॉन्टॅक्ट केला. मात्र नोरानं देखील जास्त मानधन मागितले.
नारा रोहित (Nara Rohit) -
नारा रोहित हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहे. त्याला पुष्पा चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेच ऑफर देण्यात आली. मात्र रोहितनं ही भूमिका करण्यास नकार दिला.
सामंथानं या चित्रपटातील आयटम साँगमध्ये काम केलं मात्र तिला आधी या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी विचारण्यात आले. पण त्यावेळी समंथानं या सिनेमामध्ये अभिनय करण्यास नकार दिला.
No comments:
Post a Comment