मुंबई, दि. 9 :- शीख धर्माचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले असून गुरु गोविंदसिंह जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गुरु गोविंदसिंहजी यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गुरु गोविंदसिंहजी यांनी मानवकल्याणाची, अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण दिली. नैतिक मूल्यांचं पालन करण्याचा, फळाची अपेक्षा न ठेवता सत्कार्य करत राहण्याचा त्यांचा संदेश देशाचं आणि अखिल विश्वाचं कल्याण करणारा आहे. गुरु गोविंदसिंहजी यांच्या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3F7vps0
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment