भाजपला झटका, काँग्रेसचे तौफिक हारूण शिकलगार विजयी - latur saptrang

Breaking

Wednesday, January 19, 2022

भाजपला झटका, काँग्रेसचे तौफिक हारूण शिकलगार विजयी



सांगली : 

महानगरपालिकेच्या प्रभाग ‘16 अ’ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार तौफिक हारूण शिकलगार विजयी झाले आहे. (Sangli Election Update) त्यांना 7429 मते पडली. भाजपचे उमेदवार अमोल गवळी यांना 3434 मते पडली. काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश सावंत तिसर्‍या, तर शिवसेनेचे उमेदवार महेंद्र चंडाळे चौथ्या स्थानावर गेले. सावंत यांना 587 तर चंडाळे यांना 535 मते पडली.

16 अ’ च्या जागेसाठी पोटनिवडणूक (Sangli Election Update)

    काँग्रेस नेते माजी महापौर हारूण शिकलगार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग ‘16 अ’ च्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. बिनविरोध निवडणुकीसाठी काँग्रेसने बरेच प्रयत्न केले. मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेला प्रभाग ‘16 अ’ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खुला झाला. काँग्रेसमधूनच बंडखोरी झाली आणि बिनविरोध निवडणुकीच्या आशा मावळल्या. काँग्रेसचे तौफिक शिकलगार, भाजपचे अमोल गवळी, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे आणि काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश सावंत अशी चौरंगी लढत झाली.

काँग्रेसचे शिकलगार 3995 मतांनी विजयी झाले. शिकलगार यांना 7429 मते पडली. भाजपचे गवळी यांना 3434 मते, शिवसेनेचे चंडाळे यांना 535 मते, अपक्ष उमेदवार सावंत यांना 587 मते, वंचित बहुजन आघाडीचे उमरफारूक ककमरी यांना 21 मते, अपक्ष समीर सय्यद यांना 18मते पडली.

एकूण 49.98 टक्के मतदान

Sangli Election Update मंगळवारी 34 मतदान केंद्रांवर एकूण 49.98 टक्के मतदान झाले होते. 24 हजार 390 पैकी 12 हजार 191 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. बुधवारी मतमोजणी चार फेर्‍यांमध्ये झाली. पहिल्या फेरीत काँग्रेसचे शिकलगार यांना 2206, भाजपचे गवळी यांना 887 मते, अपक्ष सुरेश सावंत यांना 192, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 114 मते पडली. दुसर्‍या फेरीअखेर शिकलगार यांना 4042 मते, गवळी यांना 1698 मते, अपक्ष सुरेश सावंत यांना 426 , शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 340 मते पडली. तिसर्‍या फेरीअखेर शिकलगार यांना 6025 मते, गवळी यांना 2563 मते, अपक्ष सुरेश सावंत यांना 517 , शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 447 मते पडली. चौथ्या फेरीअखेर शिकलगार यांना 7429 मते, गवळी यांना 3434 मते पडली. अपक्ष सुरेश सावंत यांना 587, शिवसेनेचे महेंद्र चंडाळे यांना 535 मते पडली. काँग्रेसचे तोफिक शिकलगार 3 हजार 995 मतांनी विजयी

काँग्रेसचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, नगरसेवक मयुर पाटील, फिरोज पठाण, अभिजीत भोसले, मंगेश चव्हाण तसेच नगरसेवक व कार्यकर्ते यासाठी राबले. काँग्रेसला राष्ट्रवादीची मोलाची साथ लाभली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रभागात प्रचार बैठका घेतल्या. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, सागर घोडके, उमर गवंडी यांनी समर्थकांची फळी काँग्रेसचे उमेदवार शिकलगार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी केली.

तौफिक शिकलगार यांच्या विजयासाठी काँग्रेस नेते डॉ. विश्वजीत कदम यांचे कट्टर समर्थक नगरसेवक मयूर पाटील यांनी बरीच मेहनत घेतली. पोटनिवडणुकीत भाजपला विजयाची आशा होती. मात्र पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रभागात विविध ठिकाणी बैठका, मतदारांशी संवाद साधून प्रचारात रंग भरला होता. मात्र गवळी यांना विजय प्राप्त करता आला नाही.

No comments:

Post a Comment