मुरुड येथील क्रीडा संकुलनचे मैदान झाडाझुडपात ..!
भाजपा.यु.रवी माकुडे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
मुरुड क्रीडा संकुलनाला शासनाकडून करोडो रुपये मिळत असून त्या पैशाचा पुरेपूर वापर करून मुरुड मधील युवकांना सर्व खेळाचे साहित्य व अत्याधुनिक मैदाने तयार करून दिले नाही तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुरुड तर्फे १ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल :- रवी माकुडे
मुरुड( प्रतिनिधी):- मुरुड येथील क्रीडा संकुलामध्ये मैदानावरील स्वच्छता सुधारित अत्याधुनिक साहित्यसाठी मागणी
देण्यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे भाजपा युवा शहराध्यक्ष रवी माकुडे यांनी अशी मागणी केली आहे
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मुरुड येथील क्रीडा संकुलन विद्यार्थी व युवकांना मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्या क्रीडासंकुलाची अवस्था खूपच पडीक घरासारखी झाली असून तेथील मैदानावर झाडे झुडपे आली आहेत. क्रिडा संकुलनामध्ये फक्त एक ते तीनच खेळ खेळले जातात. इतर कोणत्याही खेळाचे साहित्य उपलब्ध नाहीत.
अशावेळी मैदानी खेळ खेळण्यासाठी साहित्य देण्यात यावे व येथील युवकांनी , विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल व त्यांचा सर्वांगिन विकास होईल, तसेच हॉकी, हॉलीबॉल ,कबड्डी, फुटबॉल, बास्केट बॉल, क्रिकेट सारखे खेळ खेळण्यासाठी स्वच्छता करून द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपा युवा शहराध्यक्ष रवी माकुडे यांनी अशी मागणी तहसीलदार लातूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,
तसेच या विविध मागण्या पूर्ण न झाल्यास मुरुड भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १ मार्च रोजी पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर भाजपा युवक शहराध्यक्ष रवी अरुण माकुडे यांची स्वाक्षरी आहे.
No comments:
Post a Comment