मुंबई,दि. २९ : जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु कोरोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक कोरोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ४४ डॉक्टरांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, शिक्षण संस्थाचालक लल्लन तिवारी, ‘परिश्रम’ संस्थेचे निमंत्रक ॲड. अखिलेश चौबे, डॉ. राजकुमार त्रिपाठी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे विज्ञान, औषधीशास्त्र व वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती होत असताना दुसरीकडे नवनवे आजार जगात येत आहेत. कोरोना संसर्ग सर्वांसाठी परीक्षेचा काळ होता. अमेरिकेसारख्या प्रगत देशात रुग्णसंख्या व मृत्यूदर जास्त होता. परंतु सेवाभाव भारतीयांच्या डीएनएमध्ये असल्यामुळे या कठीण काळात भारतातील रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी होता. आरोग्य सेवक तसेच समाजसेवकांचे हे कार्य भविष्यातील डॉक्टरांकरिता मार्गदर्शक ठरेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉ. राजीव जोशी, डॉ. वैभव कुबल, डॉ. कुमार दोशी, डॉ.सुयोग दोशी, डॉ.अश्विनी पत्की दोशी, डॉ.राहुल त्रिपाठी, डॉ.पूर्वी छाबलानी, डॉ.संजीत शशीधरन, डॉ.वैजयंती कदम, डॉ.सुशील जैन, डॉ.राहुल वाकणकर, डॉ.त्रिदिब चॅटर्जी, डॉ.निखिल कुलकर्णी, डॉ.हनी सावला, डॉ.मनीष शेट्टी, डॉ.आदित्य अग्रवाल, डॉ.शिल्पा वर्मा, डॉ.नरेंद्र शर्मा, डॉ.अनिता शर्मा, डॉ.ओमप्रकाश शर्मा, डॉ.श्रीप्रकाश चौबे, डॉ.रुणम चड्ढा, डॉ.मोहसीन अन्सारी, डॉ.अमेय पाटील, डॉ.स्वप्नील शिरसाठ, डॉ.अमर द्विवेदी, डॉ.राजेश दहाफुटे, डॉ.पारितोष बाघेल, डॉ.अब्दुल खलीक, डॉ.मुकेश शुक्ला, डॉ.संजय राठोड, डॉ.विवेक शर्मा, डॉ.आमिर कुरेशी, डॉ.भरत तिवारी, डॉ.जीत संगोई, डॉ.शिखर चौबे, डॉ.शैलेंद्र सिंह, डॉ.महाबली सिंह, डॉ.राजेश ढेरे, डॉ.व्यंकटेश जोशी, डॉ.प्रदिप नारायण शुक्ला, डॉ.निखिल शहा, डॉ.नेहा शहा आणि अनिल त्रिवेदी यांचा सत्कार करण्यात आला.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://bit.ly/3s4A4WS
https://bit.ly/3GblJNq
No comments:
Post a Comment