पुणे मनपा क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय - latur saptrang

Breaking

Tuesday, January 4, 2022

पुणे मनपा क्षेत्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय

 




पुणे;

पुणे मनपा क्षेत्रातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. हे वर्ग आता ऑनलाईन भरतील. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.

नियम न लावल्यास कडक निर्बंध करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

अजित पवार काय म्हणाले ?

30 जानेवारी पर्यंत शाळा बंद असणार

पुण्यातील बाधित दर 18 टक्क्यांवर

कोरोनाग्रस्तांवर उपचार प्रोटोकॉल केंद्रानं लवकर कळवा

उद्या सकाळी 9 वाजता, मुंबईत उच्चस्तरीय अधिकारी यांची बैठक घेणार आहे, त्यात राज्यात एकच निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात घेतला जाणार आहे.

आजच्या बैठकीत काही मुद्दे उपस्थित झाले आहेत, त्यावर विचार घेतला जाणार आहे

पुण्यात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, मास्क नसताना थुंकल्यास १ हजार दंड

पुण्यात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, मास्क नसताना थुंकल्यास १ हजार दंड

लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजेत

पुण्यात दोन्ही घेतले नसल्यास शासकीय कार्यालयात प्रवेश नाही

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागात मास्क नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाणार

दोन्ही डोस घेतले तरच त्यांचे शासकीय कार्यालयातील काम केले जाईल, जर कोणी लस घेतली नसेल तर त्यांचे काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

10 तारखेपासून बूस्टर डोस दिले जाणार आहे

दोन डोस नसेल तर हॉटेल्स, बार रेस्टॉरंट प्रवेश बंद असणार आहे

पुणे आणि दोन्ही महापालिका क्षेत्रात अंमलबजावणी होणार

No comments:

Post a Comment