भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ - latur saptrang

Breaking

Tuesday, January 4, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ४ : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ मधील पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण अर्ज  इतर कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांच्याकडे २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत  पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या परंतू, प्रवेश न मिळालेल्या तसेच भाडेतत्वावर राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वस‍तिगृहामधील प्रवेशित मुलां-मुलीप्रमाणे भोजन भत्तानिवास भत्ताशैक्षणिक साहित्यनिर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत नियमानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रती वर्षी 60 हजार इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शासनामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी  स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रांसह २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पाठवावा, असे आवाहन समाधान इंगळेसहाय्यक आयुक्तसमाज कल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3qRhqS5
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment