जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार....... - latur saptrang

Breaking

Monday, January 17, 2022

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार.......






 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा तुघलकी कारभार त्या शाळेचे अनुदान रद्द करा,शिक्षण अधिकार्‍यांनी उपसंचालकाकडे केलेली शिफारस अन्यायकारक




लातूर / पानगाव ता. रेणापूर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेचे अनुदान रद्द करा यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे जी शिफारस केली आहे ती साफ चुकीची आणि अन्यायकारक असून बिंदूनामावलीनुसार संस्थेने दिलेला प्रस्ताव बाजूला सारून शिक्षण विभागातील अधिकारी - कर्मचारी यांनी जो गैरकारभार चालविला आहे याची खातेनिहाय चौकशी करण्यात येऊन दोषी प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, तत्कालीन अधिकारी विशाल दशवंत, अधिक्षक वर्ग २ मधुकर वाघमारे व संबंधित लिपीक हिरा शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी मराठवाडा प्रदेश निराधार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केली आहे, मागील सात दिवसापासून शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराविरोधात जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पानगावच्या वतीने २८ फेबुवारी २०१४ च्या मावक औरंगाबाद यांच्या िंबदूनामावली मंजुरीप्रमाणे एससी संवर्गातील सतिश कांबळे शिक्षक कार्यरत होते. जि.प. शिक्षण विभागाकडे संच मान्यतेनुसार ८ शाळेत कार्यरत असलेल्या पदांची िंबदूनामावली ग्राह्य धरुन अनुदानासाठी मागणी करण्यात आली होती, त्यानंतर प्रत्यक्ष अनुदानाची मागणी केली तेव्हा शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी नुसार संस्थेने मुख्याध्यापकासह आठ पदांची वेतन पडताळणी करुन शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांची माहिती दि.२ डिसेंबर २०१८ रोजी अद्यावत बिंदूनामावली पडताळणी करुन प्रमाणत केल्यानुसार मा. प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली होती यामध्ये संतोष संग्राम वाघमारे यांच्या नावाचा प्रस्ताव नसताना व त्यांना १० व्या क्रमांकावरील वाढीव पदावर व खुल्या संवर्गात घेतले असल्याने त्यांच्या नावाचा प्रस्ताव कार्यालयात दिलेला नव्हता. शाळेकडून संतोष वाघमारे यांचे नाव समाविष्ठ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसताना तत्कालीन मा.प्राथमिक शिक्षणाधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्याच्या नावाचा समावेश मुल्यांकन यादीमध्ये कोणत्या आधारे केला, त्यांना शाळेचा प्रस्ताव नसताना अनाधिकृतपणे नाव समाविष्ट करण्याचा अधिकार कोणी दिला संस्थेच्या प्रस्तावाशिवाय असे करता येते का, व त्यांना संतोष वाघमारे यांच्या नावाचा पुळका का आला असावा? असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. २८ फेबुवारी २०१४ रोजी मावक औरंगाबाद यांनी प्रमाणित केलेल्या िंबदू नामावलीमध्ये संतोष वाघमारे यांच्या नावाचा उल्लेख नाही तसेच संतोष वाघमारे यांना संस्थेने वाढीव व खुल्या संवर्गात घेतले होते तरीही प्रशासनाने कोणत्या आधारे त्यांचे नाव मुल्यांकन यादीमध्ये घेतले याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

दि.१५ फेब्रुवारी २०२१ रोजी शासनाने प्रत्यक्ष अनुदानासाठी शिक्षकांचे प्रस्ताव मागितले त्यानंतरही संस्थेने ठराव घेऊन मावक औरंगाबाद यांच्याकडून बिंदूनामावली दि. २ डिसेंबर २०१८ रोजी प्रमाणित कâेल्यानुसार मुख्याध्यापक व ७ सहशिक्षकांच्या नावाचा उल्लेख करुन प्रस्ताव सादर करण्यात आला होता, यापूर्वीच संतोष वाघमारे या शिक्षकाने राजीनामा दिल्याने व ते शाळेत कार्यरत नसल्याने त्यांचे नाव वगळून इतर ८ जणांचा प्रस्ताव दाखल केला असता संबंधित विभागातील कनिष्ठ लिपिक व अधिक्षक वर्ग २ यांनी संगणमताने सदर प्रस्ताव गायब करुन फक्त त्यांच्याकडे असलेल्या सेवाजेष्ठतामधून संतोष वाघमारे यांचे नाव नवव्या क्रमांकावर असताना खुल्या वर्गात असलेले शिक्षक संतोष केंद्रे यांचे नाव वगळून संतोष वाघमारे यांचे नाव यादीमध्ये अनधिकृतपणे आदेशात समाविष्ठ करुन ३१ मार्च २०२१ रोजी चुकीच्या पध्दतीने संस्थेची दिशाभूल करुन आदेश काढला आहे.
याविरोधात संस्थेच्या वतीने वारंवार सदर आदेश चुकीचा असल्याने व आरक्षण पूर्ण असल्याने रद्द करुन संतोष केंद्रे यांचे नाव खुल्या संवर्गात कार्यरत असल्याने त्यांचे नाव आदेशात समाविष्ठ करुन सुधारित आदेश काढण्यात यावा अशी न्याय मागणी केली असता एका शिक्षकाच्या दबावापोटी व ते राजीनामा दिल्यान ेसंस्थेचे शिक्षक नसताना सुध्दा इतर सात शिक्षकांचे अनाधिकृतपणे वेतन रोण्याचा हा प्रकार अत्यंत चुकीचा व दंडेलशाहीचा आहे. असे लेखी कळवून सुध्दा मा.शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी, जि.प. लातूर हे मानण्यात तयार नाहीत.
शासन निर्णयाला अनुसरुन संस्थेने कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसून आरक्षण धोरणाचे काटोकोरपणे पालन केलेले आहे व कोणत्याही शासनाच्या आदेशाची पायमल्ली केलेली नाही किंवा आदेशाचे अवमूल्यांकन केलेले नाही. कार्यालयाने चुकीचे आदेश काढल्यामुळे ते नाकारण्यात आलेले आहेत. आजच्या घडीला जो आरक्षणाचा वाद निर्माण झाला आहे ती बाब लक्षात घेऊन संस्थेचे एक पद त्यासाठी रिक्त ठेवले आहे, त्यामुळे इतर ७ शिक्षकांवर आरक्षणाचे कारण सांगुन अन्याय करता येणार नाही. त्यांचे वेतन नियमित सुरु करुन ७ जणांचे शालार्थ आय.डी. तत्काळ मंजूर करावेत. ही बाब आम्ही व संस्थेने वारंवार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे तरी संबंधित मा. शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी, अधिक्षक वर्ग २ व लिपीक कर्मचार्‍यांकडून संस्थेतील शिक्षकांवर वेगवेगळे पत्र काढून वेतन रोखण्यासारखे घोर अन्याय करत आहेत व वेळकाढूपणा करत आहेत. याची वाचा फोडण्यासाठी तसेच संस्था चालकांकडून आलेल्या प्रस्तावात अधिकार नसताना परस्पर करत आहेत. याची वाचा फोडण्यासाठी तसेच संस्था चालकांकडून आलेल्या प्रस्तावात अधिकार नसताना परस्पर बदल करणे, संस्थेचा दिलेला मूळ प्रस्ताव संगणमताने गायब करणेख् अधिकार नसताना बिंदूनामावली डावलून, सेवाज्येष्ठता डावलून, अनाधिकृतपणे पात्र शिक्षकांचे नाव वगळून दुसर्‍याचे नाव समाविष्ट करणे, विनाकारण ११ महिन्यांपासून शिक्षकांचे पगार रोखून शिक्षकांना पगारापासून वंचित ठेवणे, शालार्थ आय.डी.चा दिलेला प्रस्तावावर कार्यवाही न करणे, शाळेत कार्यरत नसलेल्या शिक्षकांचे नाव समाविष्ट करुन पुन्हा सुधारित प्रस्ताव दाखल करण्यासाठी वेगवेगळे आदेश काढून संस्थेवर व मुख्याध्यापकावर दबाव आणणे, कार्यालयीन कामकाजात मनमानी करणे या सर्व प्रकारांची खाते निहाय चौकशी समिती गठीत करुन संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी लातूर भगवान फुलारी, तत्कालिक शिक्षणाधिकारी विशाल दशवंत व अधिक्षक वर्ग २ मधुकर वाघमारे व संबंधित लिपीक या दोषींवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे मराठवाडा प्रदेश निराधार संघटना महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील शिक्षकांसह मागील सहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे, सदर शाळेतील मुख्याध्यापिका व ७ शिक्षकांचे वेतन मिळण्याचे आदेश होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरुच असणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे. यापुढे मागणी पूर्ण होत नसल्यास पुढच्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा उपोषणकर्ते संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे व उपोषणकर्ते मुख्याध्यापक महानंदा दहिफळे, संजय नागरगोजे, किरण कलमे, संतोष केंद्रे, एकनाथ कोरे, विजकुमार गव्हाणे, अनुसया म्हेत्रे, बाळासाहेब सिरसाट यांनी दिलेला आहे.

No comments:

Post a Comment