मुंबई, दि. 18 :- कला संचालनालयामार्फत 61 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन कलाकृती स्वीकारण्यास 25 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण व दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांकडून कलाकृती मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या कलावंतांना प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. यापूर्वी 5 ते 15 जानेवारी 2022 पर्यंत कला संचालनालयाच्या http:doaonline.in/doakalapradarshan/public/home या लिंकवर ऑनलाईन स्वरुपात कलाकृती सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता या कलाकृती ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास 25 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आली असून या प्रदर्शनात पारितोषिकपात्र कलाकृतींना प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे एकूण 15 पारितोषिके देण्यात येणार आहेत.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3nA7KKQ
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment