मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेत देशातून सर्वप्रथम आलेल्या अपूर्व पडघान यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. १९ आणि गुरूवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
संयुक्त सुरक्षा सेवा (कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस ) परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी कशी करावी, आवश्यक संदर्भ साहित्य, शारीरिक चाचणी आदी विषयांची सविस्तर माहिती अपूर्व पडघान यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FDWras
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment