राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली - latur saptrang

Breaking

Sunday, January 30, 2022

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवार, दिनांक 30 जानेवारी, 2022 रोजी विधान भवन, मुंबई येथे मा.सभापतींचे सचिव महेंद्र काज आणि संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी संजय पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

तसेच, हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/yaDqSEPAl
https://ift.tt/Mhf8FyP6J

No comments:

Post a Comment