मुंबई, दि. 21 : ज्येष्ठ संपादक व पत्रकार दिनकर रायकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार – संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.
**
Governor Koshyari condoles demise of senior journalist Dinkar Raikar
Mumbai, 21 : Governor Bhagat Singh Koshyari has expressed condolences on the demise of senior journalist and former editor Dinkar Raikar. In a condolence message, the Governor wrote:
“Shri Dinkar Raikar was a learned journalist and editor. He made a mark of his own while serving in various well known publications during his long and illustrious career. As Editor, Shri Raikar took a balanced view, often avoiding extreme positions. He was instrumental in mentoring numerous young journalists in Maharashtra. In his demise, Maharashtra has lost a respected editor – journalist and a kind hearted person who maintained his commitment to the people.”
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3rGMZ1n
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment