काळे विद्यापीठ विधेयक रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या बाभळगावातील घरासमोर भाजयुमोची निषेधात्मक रांगोळीद्वारे आंदोलन साखळी आंदोलन ः विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलनाचा सुरूच राहणार - latur saptrang

Breaking

Tuesday, January 18, 2022

काळे विद्यापीठ विधेयक रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या बाभळगावातील घरासमोर भाजयुमोची निषेधात्मक रांगोळीद्वारे आंदोलन साखळी आंदोलन ः विधेयक मागे घेईपर्यंत आंदोलनाचा सुरूच राहणार




 लातूर दि.18-01-2022

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिने डॉ.सुखदेव थोरात माजी अध्यक्ष विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली व सदरील अहवालाच्या आधारे अधिनियमात प्रस्तावित सुधारणा करण्यास मंत्रीमंडळाने 15 डिसेंबर 2021 रोजी मान्यता दिली. या काळ्या कायद्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रीही विद्यापीठाचे प्र-कुलपती असतील या तरतूदीमुळे मा.राज्यपाल यांच्या अधिकारांचे हनन करण्याचा प्रकार होत असून या कायद्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे. त्यामुळे हा काळा कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या बाभळगाव येथील घरासमोर भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा नेते तथा माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुचनेनुसार भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत गांधीगिरी पध्दतीने विद्यापीठ कायद्याच्या विरोधात निषेधात्मक प्रतिकृतीची रांगोळी काढून निदर्शने करण्यात आली.
या कायद्यामुळे प्र-कुलगुरू यांच्यासारख्या महत्त्वाच्या नियुक्‍तीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढणार आहे तसेच विद्यापीठासारख्या ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या पवित्र क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारही वाढण्याची शक्यता आहे. लातूर ही शैक्षणिक पॅटर्न निर्माण केलेले क्षेत्र आहे. या जिल्ह्यामध्ये विद्यापीठ उपकेंद्र आहे. खाजगी क्‍लासेसचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरमध्ये येतात. त्यामुळे हा कायदा पारीत झाला तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे लातूरचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या कायद्याबाबत फेरविचार करून हा कायदा रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. यासाठी भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या उपस्थितीत पालकमंत्र्याच्या बाभळगाव येथील निवासस्थानासमोरे विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ रांगाळी काढून निदर्शने करण्यात आली.
यावेळी या आंदोलनाला भाजपा युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव अ‍ॅड.गणेश गोमचाळे, रविशंकर केंद्रे, ओम धरणे, ज्योतीराम चिवडे, मिनाताई भोसले, सोनाली हाडोळे, अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, ज्योतीताई मार्कंडे, पूनम पांचाळ, प्रगतीताई डोळसे, अ‍ॅड.पंकज देशपांडे, वैभव डोंगरे, बोरगावकर, प्रेम मोहिते, राजेश पवार, किशोर शिंदे, बाभळगावचे ग्रा.प.सदस्य श्रीराम गोमारे, गोविंद सूर्यवंशी, पांडुरंग बोडके, आकाश पिटले, निखिल शेटकार, यशंवत कदम यांच्यासह भाजपा युमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment