Naughty नामर्द, बिगडे नवाब... अमृता फडणवीसांची महाविकासआघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका - latur saptrang

Breaking

Sunday, January 30, 2022

Naughty नामर्द, बिगडे नवाब... अमृता फडणवीसांची महाविकासआघाडीच्या नेत्यांवर बोचरी टीका

 



मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून महाविकासआघाडीतील प्रमुख नेत्यांना डिवचले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत, नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी या तिन्ही नेत्यांचा उल्लेख अनुक्रमे Naughty नामर्द, बिगड़े नवाब आणि नन्हें पटोले, असा केला आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांकडून अमृता फडणवीस यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल. (Amruta Fadnavis take a dig at Mahavikas Aghadi leaders)

अमृता फडणवीस या सातत्याने ठाकरे सरकारच्या कारभारावर टीका करत असतात. त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट टीका केली आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य आणि ताडदेवमध्ये इमारतीला लागलेल्या आगीच्या मुद्द्यावरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले होते.


नाना पटोले प्रकरणात आता अमृता फडणवीसांचीही एंट्री


राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांची अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह टीका

काही दिवसांपूर्वी भाजपच्या आयटी सेलच्या नेत्याने रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या ट्विटमुळे वादंग निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजपवर टीका करताना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना विनाकारण वादात खेचले होते. भाजपच्या नेत्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी यांची उपमा दिली असेल तर त्या खूपच नशीबवान आहेत. राबडीदेवी या चूल, मूल आणि घर सांभाळणारी स्त्री होती. बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर लोकांसमोर रश्मी ठाकरे यांची प्रतिमा 'डान्सिंग डॉल'सारखी गेली असती. राबडीदेवींची उपमा दिली जाते याचा अर्थ रश्मी ठाकरे यांची प्रतिमा तितकीही वाईट नाही. तसेच भाजपवाल्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय गुण उधळले, हेदेखील ट्विट करुन सांगावे, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले होते. विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही टीका केली होती.


No comments:

Post a Comment