देशात नव्या रुग्णसंख्येत .८ टक्के वाढ; १ हजार मृत्यू
नवी दिल्ली - देशात (India) गेल्या २४ तासात कोरोनाचे (Corona) १ लाख ७२ हजार ४३३ नवे रुग्ण आढळले आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या नव्या संख्येत ६.८ टक्क्यांची वाढ झाली. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. आतापर्यंत जवळपास १६७.८७ कोटी डोस देण्यात आले आहे. (India Corona Patient Update)
गेल्या आठवड्याभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. रिकव्हरी रेट हा ९५.१४ टक्के इतका झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ लाख ३३ हजार ९२१ रुग्ण आहेत.
देशात काल दिवसभरात २ लाख ५९ हजार १०७ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत एकूण ३ कोटी ९७ लाख ७० हजार ४१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ तासात १ हजार ८ जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ४ लाख ९८ हजार ९८३ इतकी झाली आहे.जगात आतापर्यंत ३८ कोटी १ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगभरात जवळपास ५६ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी डेल्टा व्हेरिअंटमुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली होती. त्यानंतर आता ओमिक्रॉन या नव्या वेगाने संसर्ग होणाऱ्या व्हेरिअंटने चिंता वाढवली आहे.
No comments:
Post a Comment