"परीक्षा ऑफलाईनच! विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा शासन पाठिशी"
राज्यात दहावी- बारावी बोर्डाच्या परिक्षा (SSC-HSC Board Examination) ऑफलाईन घ्याव्या, अशी मागणी करत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अभ्यासक्रम ऑनलाइनच शिकवण्यात आल्याने परिक्षा देखील ऑनलाइनच घ्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी परीक्षा ऑफलाइनच (Offline Exam) होणार असे स्पष्ट संकेत दिले आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, मी सुरुवातीपासून सांगतेय परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. तज्ञांचेही तेच मत आहे, मागील ३ महिने आम्ही ऑफलाईन परीक्षेची तयारी करतोय. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा शासन त्यांच्या पाठिशी आहे. नुकतीच शिक्षण मंडळानेही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षणासंदर्भात निर्णय घेताना आम्ही तज्ञ, पालक, शिक्षकांशी बोलून घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं.
No comments:
Post a Comment