भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य - latur saptrang

Breaking

Sunday, February 27, 2022

भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

 





 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य


औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. 'समर्थांशिवाय शिवाजी महाराजांचं स्थान काय?' असं विधान कोश्यारी यांनी केलं आहे. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

औरंगाबाद शहरातील तापडिया नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या, समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे", असं कोश्यारी म्हणाले.

राज्यपालांवर टीका.....

राज्यपाल यांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. शिव चरित्र अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं आहे की, राज्यपाल कोश्यारी हे बेताल, निराधार आणि खोडसाळ वक्तव्य करण्यात गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. राज्याचे राज्यपाल होऊन त्यांना दोन वर्ष झाले आहे. त्यामुळे त्यांनी महाराजांबद्दल अभ्यास करावा. तसंच समर्थ रामदास कधीच महाराजांचे गुरु नव्हते मात्र, तरीही असं सांगून राज्यपाल यांनी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. यामुळे राज्यपाल यांनी तात्काळ मागे माफी मागावी, असंही कोकाटे म्हणाले.





No comments:

Post a Comment