हिजाबच्या समर्थनार्थ उदगीर शहरात हजारो महिला उतरल्या रस्त्यावर
कर्नाटक राज्यात हिजाबचा विरोध केल्याने कर्नाटक राज्यात घडलेल्या घटनेचे महाराष्ट्र राज्यात पडसाद उमटत आहेत. लातुर जिल्ह्यातील उदगीर शहरात हिजाबच्या समर्थनार्थ महिलांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन केले आहे.
हिजाब आमचा अधिकार असून हा आमचा अधिकार कोणीही काढू शकत नाही असा पवित्रा महिलांनी घेतला आंदोलनातील महिलांची वाढती संख्या पाहून पोलीस प्रशासनाने मुख्य रस्ता बंद करून शहरातून होणारी वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली शहरात शांतता सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
यात RCP पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक एडके यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बारकाईने नजर ठेवून होते या आंदोलनात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
आयोजक जमीयत उलेमा-ए-हिंद .
समर्थन कांग्रेस,राष्ट्रवादी,एमआईएम,रष्ट्रीय दलित अधिकार मंच,सहारा मित्र मंडल, एमपीजे,भीम संघटना,सपा, जमात ए इस्लामी,जन परिवर्तन,भ्रष्टाचार निर्मुलण अभियान,भारतीय मानव अधिकार परिषद,आल इंडीया दलील पॅंथर सेना,
No comments:
Post a Comment