‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Monday, February 28, 2022

‘गांधीतीर्थ’ सर्वांसाठी प्रेरणास्थान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जळगाव दि. 28 (जिमाका वृत्तसेवा ) – जैन हिल्स येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या गांधी धाममध्ये बापूंचे जीवन चित्रित केलेले आहे. लहान मुली-मुले आणि तरुण पिढी येथे येऊन प्रेरणा घेतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थला भेट दिली. गांधी तीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले, या वेळी अतुल जैन सोबत उपस्थित होते.

संपूर्ण जगाला गांधी विचारांची आवश्कता असून गांधी विचारांचे संस्कार अत्याधुनिक पद्धतीने युवा पिढीसमोर गांधीतीर्थ पोहचवित आहे. जगातील सुप्रसिद्ध अशा ऑडिओ गाईडेड म्युझियम खोज गांधीजी की या संग्रहालयास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट दिली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपाल महोदयांचे सुती हार देऊन स्वागत केले. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.

गांधी तीर्थ साकारताना भवरलालजी जैन यांनी शेती, माती, पाणी आणि शेतकरी तसेच देशाचा, तरुणाईच्या भल्याचा विचार केला. तरुणांना गांधीजींचा आदर्श अनुभवता यावा यासाठी त्यांनी जैन हिल्स येथे गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधी तीर्थची निर्मिती केली. या माध्यमातून युवाशक्ती, तरुणांबद्दल तसेच ग्रामविकास, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्याबाबत ते सदैव प्रयत्नशील होते.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/JKEy4GZ
https://ift.tt/40wLbrD

No comments:

Post a Comment