मुंबई :
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांनी आज (दि. २८) उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde), गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार संभाजी राजे यांना मागण्या मान्य केल्याचे लेखी दिले. एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या झाल्या मान्य..
- मराठा समाजातील युवकांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
- सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेमध्ये रिक्त असणारी पदे 15 मार्च, 2022 पर्यंत भरणार.
- सारथीचे व्हिजन डॉक्यूमेंटबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन 30 जून, 2022 पर्यंत त्याची पूर्तता करणार.
- सारथी संस्थेच्या आठ उपकेंद्र उभारणीसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव 15 मार्च, 2022 पर्यंत मंत्रिमंडळापुढे ठेवला जाणार.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला आणखी 20 कोटी, तसेच पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त 100 कोटींचा
- निधी देणार (100 कोटींपैकी 80 कोटी दिलेले आहेत)
- व्याज परताव्याबाबत कागदपंत्रांची पूर्तता करुन व्याज परतावा देणार.
No comments:
Post a Comment