युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबई शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन - latur saptrang

Breaking

Friday, February 25, 2022

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुंबई शहरातील नागरिक, विद्यार्थ्यांनी शहर जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन

मुंबई, दि. २४- सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून मुंबई शहर जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.
केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली
● टोल फ्री – 1800118797
● फोन 011-23012113 / 23014105 / 23017905
● फॅक्स 011-23088124
● ईमेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क
साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,मुंबई शहरच्या 022- 22664232 या दूरध्वनी क्रमांकावर आणि mumbaicitync@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी शेवटी केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/GpV1RSj
https://ift.tt/Ysvdoi7

No comments:

Post a Comment