मंत्री मलिक यांच्या अटकेचा निलंग्यात निषेध - latur saptrang

Breaking

Friday, February 25, 2022

मंत्री मलिक यांच्या अटकेचा निलंग्यात निषेध



 निलंगा (शहाजेब कादरी) : महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना नाहक ई.डी.च्या माध्यमातून कसलीही नोटीस किंवा चौकशी न करता सकाळी ४.०० वाजता त्यांच्या घरी जाऊन अटक केली. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगतातून मोदी सरकारचा व भाजपाच्या लोकशाही विरोधी धोरणाचा निषेध केला.

यावेळी राष्ट्रवादीचे लक्ष्मण कांबळे, काँग्रेसचे दयानंद चोपणे, शिवसेनेचे तालुकप्रमुख अविनाश रेशमे, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष इस्माईल लद्दाफ, बौद्ध महासभेचे रोहित बनसोडे, टिपू सुलतान संघटनेचे मुजीब सौदागर, महाराष्ट्र विकास आघाडीचे देवदूत सूर्यवंशी, गणराज्य संघाचे रामलिंग पडसाळगे, शिवसेनेचे ईश्‍वर पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, युवासेनेचे क्रांतिवीर लहुजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी  प्रशांत माळी, सबदर कादरी, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष उल्हास सूर्यवंशी, युवक शहरअध्यक्ष धम्मानंद काळे, महिला आघाडीच्या राष्ट्रवादीच्या पानफुलाताई पाटील, मुन्नाबी मोमीन, संगीता कदम, उद्धव मेकाले, सिद्दिक मुल्ला, मुस्ताक शेख, इफरोज शेख, निजाम शेख, समीउल्ला कादरी, रवी पाटील, धोंडीराम वाघमारे शिवसेनेच्या महिला प्रमुख रेखा पुजारी, प्रसाद मठपती, सुनील नाईकवाडे, इत्यादी विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment