श्रीक्षेत्र धोत्रा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव मर्यादित स्वरूपात होणार साजरा
शासकीय दिशानिर्देश अनुसार दर्शनी स्वरूपात होणार यात्रा
सिल्लोड/प्रतिनिधी
धोत्रा ता सिल्लोड येथील दरवर्षी महाशिवरात्री पासून होणार श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव या वर्षी मर्यादित स्वरूपात साजरा होणार असल्याचे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.याबाबत धोत्रा येथे यात्रा आढावा पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली. या बैठकीत तहसील,पोलीस तसेच अन्य सर्व विभागाचे प्रतिनिधी हजर होते.यावर्षी ही यात्रा जोरदार पणे भरण्याची चिन्ह दिसत असल्याचे दिसून येत आहे. कारण दोन वर्षापासून कोरोना मुळे ही यात्रा भरत नव्हती आता यावर्षी प्रशासनाकडून कोरोना समबंधीत दिशा निर्देश पाळून फक्त भाविकांना श्री सिद्धेश्वर महाराज दर्शन व्हावे म्हणून फक्त दर्शनी यात्रा भरवण्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.मागील वर्षी ही यात्रा पूर्णपणे बंद होती त्यामुळे बरेच भक्त दर्शन घेण्यासाठी यावर्षी धोत्रा तीर्थक्षेत्री गर्दी करू शकतात यामुळे अनेक ठिकाणी सि सि टीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत,ठीकठिकाणी पोलीस ,आरोग्य विषयक कॅम्प ,जनजागृती बॅनर ,भाविकांना पिण्याचे पाणी,महामंडळाच्या अधिकच्या बस गाड्या आदी सुविधा भाविकांना पुरवण्याच्या समबंधित सूचना देण्यात आल्या आहे.दिशानिर्देश न पाळणाऱ्या लोकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले असून यात्रा मर्यादित प्रमाणात असल्याने कुणीही याबाबत शासकीय बाबींची पूर्तता न केल्यास समबंधित विभागावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यात्रा उत्सवाची समिती मा.धर्मदाय कार्यालय यांनी नेमून दिली आहे यांनी आपले कार्य जबाबदारी पूर्वक पार पाडावी असे सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment