नेहरु युवा केंद्राची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
हिंगोली, (जिमाका) : नेहरु युवा केंद्र, युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार यांचा वतीने जिल्हा क्रिडा संकुल येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर धावणे, लांब उडी आणि सांघिक खेळ यामध्ये कबड्डी हे प्रकार होते.
यामध्ये जे युवक व युवती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजेते होऊन जिल्ह्यासाठी पात्र झाले होते. त्याच पात्र खेळाडुंची जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उदघाटन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या हस्ते करण्यात केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गंगावणे, आदर्श स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष माधव चव्हाण, कल्याण पोले हे तर प्रशिक्षक म्हणून विजय जाधव, बालाजी नरुटे, रवि हनुवते, गजानन आडे उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी युवकांना कसे तंदुरुस्त राहता येईल आणि आपले योगदान खेळामध्ये कशा प्रकारे दिले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह, पदक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या स्पर्धेत अनेक खेळाडू, पालक वर्ग, नागरिक आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी तालुका समन्वयक प्रवीण पांडे, संदीप शिंदे, नामदेव फरकांडे, अनिल बनगे, कृष्णा पखवाने, शंकर दिवटे, सुदर्शन राठोड, सोपान सोनटक्के, निलकंठ कुंभारे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment