मुस्लीम मुलगी येताच हिंदूत्ववाद्यांची हुल्लडबाजी - latur saptrang

Breaking

Wednesday, February 9, 2022

मुस्लीम मुलगी येताच हिंदूत्ववाद्यांची हुल्लडबाजी




    मुंबई : कर्नाटकमध्ये हिजाबवरून राजकारण (Karnataka Hijab Row) चांगलंच तापलं आहे. हिजाब घालून आलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. तसेच हिंदू धर्मातील विद्यार्थी महाविद्यालयात भगवे दुप्पटे घेऊन येत आहेत. आज भगवे दुपट्टे घेतलेल्या हिंदूत्ववादी विद्यार्थ्यांनी एका हिजाब घातलेल्या मुलीला छेडले. त्याचा व्हिडिओ शेअर करत मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. (Saffron Shawls Student Heckled Muslim Girl)

नेमका व्हिडिओ काय? -

एक विद्यार्थिनी हिजाब घालून कर्नाटकातील उडपीतील पीईएस महाविद्यलयात जात होती. यावेळी भगवे दुपट्टे घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी तिला घेराव घातला आणि ''जय श्री राम'' अशी घोषणाबाजी केलीय. त्या विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तरीही विद्यार्थ्यांनी जय श्री रामची घोषणाबाजी केली. तसेच महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजी केली.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले? -

हा व्हिडिओ उडपीतील पीईएस महाविद्यालयातील असून भगवे दुपट्टे घेतलेले विद्यार्थी हिजाब घालून आलेल्या मुलीची छेड काढताना दिसतात. हे तथाकथित भक्त भारताचा नक्कीच पाकिस्तान बनवतील. हे राम, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.



No comments:

Post a Comment