वेहेळगाव सब स्टेशन मध्ये अतिरिक्त फिडर चे उद्घाटन संपन्न
वेहेळगाव (यूसुफ पठान) :- येथील वीज वितरण कंपनीचे 33/11kv चे विद्युत उपकेंद्रा मध्ये दोन फीडर नव्याने बसवण्यात आले असून या नवीन फिडरचे उदघाटन आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या हस्ते करण्यात आले.
वेहेळगाव सब स्टेशन मधून कमी दाबामुळे विद्युत पुरवठा होत असल्यामूळे सामान्य नागरिक व शेतकरी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परिसरातील शेतकऱ्यांची होणारी गैरसोय व त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन वीज वितरण कंपनीस अतिरिक्त फिडर बसून देण्याच्या सूचना केल्या होत्या.
यानुसार वेहेळगाव सबस्टेशन मध्ये दोन अतिरिक्त फिडर बसविण्यात आले असून त्याचा शुभारंभ नारळ फोडून आज केला.
नव्याने बसविण्यात आलेल्या फिडर मुळे वीज पुरवठा उच्च दाबाने मिळणार असून याचा फायदा वेहेळगाव, कळमदरी, आमोदे, बोराळे, जामदरी, तळवाडे या गावातील शेतकरी व नागरिकांना होणार असल्याने उपस्थित पंचक्रोशीतील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
सोबत शिवसेना तालुकाप्रमुख किरणभाऊ देवरे, अमोलशेठ नावंदर वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्री. वाटपाडे साहेब व सहाय्यक अभियंता श्री. सोनटक्के साहेब आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment