मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती आर.विमला यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवरून मंगळवार दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक श्रीमती राखी पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, ऑक्सिजन खाटांची उपलब्धता, जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती, शाळा, महाविद्यालये सुरू करताना घेण्यात येत असलेली काळजी आदी विषयांची माहिती, श्रीमती आर.विमला यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/tP45TwR
https://ift.tt/XonDdbU
No comments:
Post a Comment