लातूर/प्रतिनिधी:पद्मश्री अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्या औसा तालुकाध्यक्षपदी युनूस चौधरी तर शहराध्यक्षपदी सुनिल उटगे यांची निवड करण्यात आली.
न्यासच्या वतीने औसा येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ही निवड झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हनिफभाई शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सचिव बासिदखान पठाण यांची उपस्थिती होती. यावेळी न्यासच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अँड.किशोर शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष पदी बाबुअप्पा मिटकरी यांची निवड करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाध्यक्ष हनिफ शेख यांनी पद्मश्री अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात देश हितासह जनसामांन्याच्या अधिकारासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताकतीने लढा द्यावा,असे मत व्यक्त केले.अण्णांनी आत्तापर्यंत दिलेले लढे व पुढील आंदोलनाबद्दल मार्गदर्शन केले.बासिदखान पठाण यांनी न्यासची रुपरेषा सांगितली. अँड.किशोर शिंदे यांनी मानवी हक्क व कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास नंदकुमार देशपांडे,हरिभाऊ कुलकर्णी,
माजी शहराध्यक्ष ए.एस.
देशमाने,यु.एस बनसोडे,एच.बी मांजरे, बालाजी कदम, ए.डी. जांडे,अँड.एस.व्ही.म्हेत्रे, भैरोबा ढोक,वीरभद्र कोपटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन युनूस चौधरी तर आभार सुनिल उटगे यांनी मानले.
No comments:
Post a Comment