लातूर,
लातूर शहर महानगर पालिकेत कचरा ठेका प्रकरणी चार कोटी रूपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक प्रकाश पाठक यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. याची तक्रार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात 31 जानेवारी रोजी देण्यास गेेले होते. यावेळी प्रकाश पाठक यांना तेथील पोलीस कर्मचार्यांनी प्रकाश पाठक यांना अर्वाच्च शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्कीचा प्रकार केला आहे. हा प्रकार निंदणीय आहे. लातूर शहर महानगर पालिकेच्या कचरा ठेका भ्रष्टाचार प्रकरणी व शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार देताना शिवीगाळ व धक्काबुक्की करणार्या पोलीसांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत या मागणी साठी लातूर शहर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्याकडे बुधवार दि. 2 फेब्रुवारी रोजी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची कारवाई न झाल्यास या प्रकाराच्या विरोधात लातूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिवृ आंदोलन करण्यात येईल असा ईशारा लातूर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी लातूर शहर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, सभागृह नेता शैलेश गोजमगुंडे, सरचिटणीस प्रविण सावंत, नगरसेवक सुनिल मलवाड, संजय रंदाळे, शहर उपाध्यक्ष महेश कौळखेरे, अभिजीत मुनाळे, शशिकांत हांडे यांच्यासह शहर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment