Jhund release date : नागराज मंजुळेच्या 'झुंड'चा मुहूर्त ठरला - latur saptrang

Breaking

Wednesday, February 2, 2022

Jhund release date : नागराज मंजुळेच्या 'झुंड'चा मुहूर्त ठरला



फँड्री, सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी काहीतरी नवी कथा घेऊन येतोय. या वर्षी त्याचा झुंड हा चित्रपट रिलीज होतोय. झुंड कोणत्या दिवशी रिलीज होणार याची रिलीज डेट (Jhund release date) समोर आलीय. या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही बातमी दिलीय की, झुंड कुठल्या दिवशी रिलीज होतोय. (Jhund release date अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिलंय-

T 4178 – Iss toli se muqaabla karne ke liye raho taiyaar! Humari team aa rahi hai ⚽Goal net #Jhund releasing on 4th Mar 2022 in cinemas near you. @Nagrajmanjule #BhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath @AjayAtulOnline @TSeries @tandavfilms @aatpaat @ZeeStudios_

४ मार्च दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१८ मध्ये नागपूर येथे झाले होते. स्टार ‘झुंड’च्या निर्मात्यांनी अधिकृत फर्स्ट लूक पोस्टर लॉन्च केले आहे.

‘झुंड’ हा भा एक हिंदी क्रीडा चित्रपट आहे. झोपडपट्टी सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन एका प्राध्यापकाची भूमिका साकारत आहेत. रस्त्यावरच्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करून फुटबॉल संघ सुरू करतो, अशी त्यांची भूमिका आहे.

बॉलिवूड चित्रपटाचे अभिनेते अमिताभ बच्चन पहिल्यांदाच नागराज सोबत काम करताना दिसणार आहेत.

नागराज मंजुळे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चित्रपटाची तारीख दिलीय. त्यांनी एक पोस्टरदेखील शेअर केला आहे. पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या हातात फुटबॉल आहे. आजूबाजूला झोपडपट्टी वस्ती दिसत आहे.



No comments:

Post a Comment