बीड : केजच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची मिरवणूक काढणे पडले महागात - latur saptrang

Breaking

Tuesday, February 15, 2022

बीड : केजच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची मिरवणूक काढणे पडले महागात



केज (बीड); नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून धुमधडाक्यात मिरवणूक काढली. ही मिरवणूक नगरसेवकाच्या चांगलीच अंगलट आली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वीच केजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व त्यांच्या समर्थकासह २०० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, केज येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी मंगळवारी (दि. १४ फेब्रुवारी ) रोजी निवडणूक पार पडली. याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत जमाव बंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार, मिरवणुक काढण्यास, डीजे- डॉल्बी लावण्यास सतक्त मनाई करण्यात आली होती. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे केज येथील प्रभारी अधिकारी यांनी सीआरपीसी कलम १४९ प्रमाणे समजपत्र दिले होते.

यानंतर आजही निवडणूक पार पडली. केज नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. शितलताई दांगट, नगरसेवक पती हारुन इनामदार, अंकुश इंगळे, आदीत्य अशोकराव पाटील, नगरसेवक पती पशुपतीनाथ दांगट, सोमनाथ गुंड,  नगरसेवक पती – सुग्रीव कराड, पल्लवी रांजनकर, पदमीन शिंदे शकील ईनामदार याच्यासह १५० ते २०० कार्यकर्ते नगरपंचायतसमोर एकत्रित जमले. आणि दुपारी १:०० ते ४:३० वा. वाजता चारचाकी (क्र.एमएच-४४/यु-९७९) व (क्र. एमएच-०३/एच-३६१९) वरून केज नगर पंचायत समोरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.

केज नगरपंचायतपासून मंगळवारपेठ कॉर्नर, धारुर चौक, बसस्टँड मार्गे शिवाजी चौक, कळंब रोड मार्गे फुले नगर, कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ढोल- ताशा गजरात आणि फटाके फोडून विजयी मिरवणूक काढली.

याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पाटील, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, उमेश आघाव, रमेश सानप, मंगेश भोले, शेख, म्हेत्रे, महादेव बहीरवाल हे निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी तैनात होते. गोपनीय शाखेचे अंमलदार मतीन शेख यांच्या मार्फत शासकिय व्हिडिओ कॅमेराव्दारे मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात आले. याच दरम्यान पोलिसांनी मिरवणिकीस बंदी असल्याचे वारंवार सांगत होते. तरी देखील जंगी मिरवणूक काढण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह एकूण २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत

No comments:

Post a Comment