प्रतिनिधी l देवळाली कॅम्प ;-देवळाली कॅम्प शहर सर्व धर्म समभाव असणारे शहर असून शिवजयंती उत्सव उत्सवात शांततेने साजरा करा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी शांतता समिती बैठकीत केले .यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, राहुल मोरे, संदेश पाडवी,पोलिस निरीक्षक लियाकत पठाण व्यासपीठावर उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक यांनी सांगितले की मागील २०२१ मध्ये शिवजयंती उत्सवात अनुचित प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती घडता कामा नये ,शासनाने दिलेले नियम पाळा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत करण्याचे सांगितले . यावेळी जयंती उत्सव समिती व पदाधिकारी वैभव पाळदे ,आर. डी जाधव, गोरख गावंडे,पंडित साळवे जीवन गायकवाड,गोकुळ मोजाड,प्रमोद मोजाड विविध सूचना मांडतांना सर्व धर्मय नागरिकांनी या उसव मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले यावेळी पोलीस पाटील स्वाती पानसरे, संजय गायकवाड, संदीप रोकडे, ,कॅन्टोन्मेंट आरोग्य विभागाचे निरीक्षक शिवराज चव्हाण ,संतोष गोडसे, शेखर गोडसे, शाम ढगे, निवृत्ती मुठाळ,खंडेराव मेढे, संजय गीते,विनोद गोडसे सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment