करोडोंच्या दुकानांपुढे टपऱ्या-लाँऱ्या लावणाऱ्यांची स्पर्धा.... - latur saptrang

Breaking

Saturday, February 5, 2022

करोडोंच्या दुकानांपुढे टपऱ्या-लाँऱ्या लावणाऱ्यांची स्पर्धा....







 करोडोंच्या दुकानांपुढे टपऱ्या-लाँऱ्या लावणाऱ्यांची स्पर्धा....


पीआय तिवारींची रोड मोकळा करायची दुर्ष्टी तर लाँऱ्या-टपऱ्या धारक मुकळदमांचा जीव रस्त्यावरच....


जनमत-


दोंडाईचा- येथे शहरातील दळणवळणसाठी महत्त्वाचा समजला जाणारा व सतरा कोटी रूपये खर्चुन बांधण्यात आलेल्या राजपथ रस्त्यांची दशा बदलल्यामुळे,ह्या रस्त्यावर असलेल्या मालकी हक्काच्या  लहान-लहान दुकानांना सोन्याचे दिवस आले असुन,काही लाखात विक्री होणाऱ्या दुकाना आता कोटी रूपयाच्या आत विक्री होत असल्याने, सहाजिकच हया दुकानांपुढे टपऱ्या-लाँऱ्या लावणाऱ्यांची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे भविष्यात ह्या राजपथ रस्त्यावर पुन्हा रहदारीचा प्रश्न उपस्थित होणार असुन मागील दोघी तत्कालीन सत्ताधारील गटांनी आलेल्या तक्ररींना न्याय न देता. मुग गिळून बसल्याचे सोंग करत वेळ काढली. पण आता प्रशासक यांनी तरी ठोस भुमिका बजावून लाँऱ्या-टपरी धारकांना रोडावर न बसू देता. हक्काची जागा द्यायला हवी. एकटे दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांची दुर्ष्टी राजपथ रोड मोकळा करायची असली तरी त्याला स्थानिक नगरपालीका प्रशासनाचीही तेवढीच जोड असायला हवी.तेव्हाच लाँऱ्या-टपरी धारकांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून त्यांना हक्काची जागा मिळेल व रोज करोडोंच्या दुकानांपुढे टपऱ्या-लाँऱ्या लावायची स्पर्धा ही संपेल.


आज दोंडाईचा शहर पाहिले तर पन्नास हजार वस्तीचे व रोज विकासाचे स्वप्न पाहणारे होतकरू-स्वप्नखोर लोकांचे धुळे जिल्ह्यात येणारे एक लहानशे गाव आहे. मात्र आता हे दोंडाईचा शहर लांबी-रूंदी ने जरी  एखाद्या तालुक्यापेक्षा कमी आहे किंवा दर्जा मिळवला नसला.तरी ह्या गावातील करोडोंच्या  रस्त्यांचा विकास पाहून मालकी हक्काच्या लहान-लहान दुकानांच्या किंमती करोडोंच्या घरात पोहचल्या आहेत. त्यामुळे मुळ फ्रंट भागावर म्हणजे राजपथ रस्त्यावर मालकी हक्काची दहा बाय दहाची दुकान शोधायची-घ्यायची म्हटली.तर खिशात कमीत कमी एक सव्वा करोड रूपये असायला पाहिजे. मागे दोन महिन्यापुर्वी तर ग्यानचंद मेडीकलच्या लाईनीत लाँकडाऊनमध्ये आठ बाय दहाची लहानशी चिरोटी-मोबाईल विक्रीची सुरू असलेली दुकान नव्वद लाखात कागदावर सौदा झाल्यावर देखील दुकान मालक जादा पैशाच्या लालसेने व्यवहारास फिरून गेला. म्हणून ह्या विषयाचा गावात चांगला गाजावाजा झाला. आता ही सर्व दैनंदिन करोडोंच्या राजपथ रस्त्यावरची परिस्थिती पाहिल्यावर टपरी -लाँऱ्याधारक त्यांच्या लाँऱ्या-टपऱ्या ह्या दुकानांपुढे लावण्यासाठी रोज स्पर्धा करत आहे.


मागे व आताही दोंडाईचा पोलीस स्टेशनचे डँशिंग-कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रोज ह्या करोडोंच्या राजपथ रस्त्यावरची रहदारी पाहून लाँऱ्या-टपरी धारकांना रोज हटकत-हलवत आहे. मात्र दोंडाईचा नगरपालीकेत बसलेले प्रशासक तथा अप्पर तहसिलदार यांची जोड मिळत नसल्यामुळे लाँऱ्या-टपरी धारकांना हक्काची जागा न मिळता.रोज राजपथ रस्त्यावर अनधिकृत-बेकायदेशीर करोडोंच्या दुकानांपुढे लाँऱ्या-टपऱ्या लावाव्या लागत आहे. यामुळे दोंडाईचा शहराचे करोडोंच्या रस्त्यावर विद्रूप चेहरा बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या समोर येत असुन,नगरपालीका प्रशासक तथा अप्पर तहसीलदार यांनी वेळेवरच शहानपण घेत,पोलीस निरीक्षक तिवारी साहेबांच्या कामात हातभार लावला तर सर्व लाँऱ्या-टपरीधारक यांना कायमस्वरूपी हक्काची जागा व्यवसाय करायला मिळाली तर,ते अनेकानेक आशिर्वाद देतील व ह्या राजपथ रस्त्यावर लाँऱ्या-टपरी लावण्याचा जीव सोडत.शहराच्या विकास वाढवण्यास हातभार लावतील, अशी आशा गाव विकासाचे हित जोपासणाऱ्या वर्गाकडून रहदारीच्या परिस्थितीवर निघत आहे.

No comments:

Post a Comment