कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे शाळा बंद ठेवणं योग्य नाही. यामुळे मागील दोन वर्षात मुलांचा सामाजिक विकास थांबला आहे. मुलांना कोरोनाचा तितका धोका नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. WHO आणि UNICEF ने नेहमी म्हटलंय की, बंद करण्याच्या यादीत शाळा सर्वात शेवटी यायला हव्या. आणि उघडण्यात सर्वात आधी यायला हव्यात. दोन वर्षात कोरोना संक्रमणात हे निदर्शनास आलं की, मुलांवर कोरोनाचा सर्वात कमी परिणाम झालाय. जर मुलांनादेखील अधिक प्रमाणात कोरोनाची लागण झाली असती तर ती कमी आजारी पडली असती. म्हणून आवश्यक त्या गोष्टींचं पालन करून शाळा उघडल्या जाऊ शकतात, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.
डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, “यासाठी लोकांना आणि सरकारांना विचार करण्याची गरज आहे. कारण, ओमायक्रॉन कोरोनाचा अखेरचा व्हेरियंट नाही. अशी शक्यता आहे की, भविष्यात याचे आणखी व्हेरियंट्स समोर येतील. अशी स्थितीत आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे. जर भविष्यात पुन्हा अशी प्रकरणे वाढू लागली तर आपल्याला काय ॲक्शन घ्यावी लागेल. आधी काय बंद करावं लागेल. सुरुवातीपासूनचं WHO आणि UNICEF ने म्हटलं आहे की, शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात. कारण, आम्हाला माहिती आहे की, मुलांचं केवळ शिक्षणचं नाही तर संपूर्ण विकासदेखील शाळेत होतो. मागील दोन वर्षात मुलांचं खूप नुकसान झालं आहे. हे नुकसान दीर्घकाळ सहन करायला लावणारे नुकसान आहे. आमचा सल्ला आहे की, जगभरात सर्व सरकारने जिथे शक्य असेल तिथे शाळा उघडाव्यात.”
त्या म्हणाल्या, “पालकांना प्रश्न आहे की, लसीकरणाविना मुलांना शाळांना पाठवणे योग्य असेल का? तर उत्तर आहे की, हो आपण पाठवू शकतो. कारण, दोन वर्षांपासून आपण जे कोरोनाचे संक्रमण पाहत आलोय, यामध्ये एक बाब समोर आलीय की, जर मुलांना संक्रमण झालेचं तर ती अधिक आजारी पडत नाहीत. खूप कमी अशी मुले आहेत की, ज्यांना आधी गंभीर आजार असेल, त्यांनी धोका आहे. तर निरोगी मुलांना याचा कमी धोका आहे.
मुलांना शाळेला पाठवल्यामुळे काही केसेस नक्की वाढू शकतात. यापासून बचावासाठी सहा वर्षांपेक्षा मोठी मुले मास्क लावून शाळेला जाऊ शकतात.”
ओमायक्रॉनचे सर्व व्हेरियंट किती घातक आहेत, याच्या उत्तरादाखल डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, “सर्व व्हेरियंट BA.2, ओमाक्रॉनचाच एक वंश आहे. यासाठी तीन वंश असताता- जसे की BA.1, BA.2 आणि BA.3. सुरुवातीला BA.1 प्रमुख होतं. आता भारत, डेन्मार्क आणि यूकेमध्ये BA.2 सर्व व्हेरियंट वाढत आहेत. अनेक देशांमध्ये आता कोरोना केसेस कमी होत आहेत. पण, BA.2 वाढत आहे. याचा अर्थ असा की, हा अधिक पसरतो आणि अधिक परिणामकारक ठरतो. आतादेखील सतर्क राहण्याची गरज आहे.”
No comments:
Post a Comment