लता मंगेशकरांची तब्येत पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले - latur saptrang

Breaking

Saturday, February 5, 2022

लता मंगेशकरांची तब्येत पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले



लता मंगेशकरांची तब्येत पुन्हा बिघडली, व्हेंटिलेटरवर हलवले

 मुंबई- गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर (व्हेंटिलेटर) हलवण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांना करोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ९२ वर्षीय लतादीदी आयसीयूमध्ये होत्या. 

डॉक्टरांचं पथक करत आहेत निरीक्षण

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणार्‍या डॉ. प्रतित समधानी यांनी सांगितले की, लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर २४ तास लक्ष ठेवून आहे.


उपचारादरम्यान मृत्यूची उडाली होती अफवा


काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा पसरली होती. यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करत मंगेशकर कुटुंबियांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली होती. यावेळी डॉ. प्रतिमा समदानी यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहितीही दिली होती. 'दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन स्वघरी जाव्यात अशी आमची इच्छा आहे.'


लताजींनी डोळे उघडले- राजेश टोपे

पाच दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की, 'मी लताजींवर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी बोललो. त्या बऱ्या होत आहेत. त्यांनी करोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. त्या पहिल्यांदा व्हेंटिलेटरवर होत्या. पण आज त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले. आता तिला फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. लतादीदींनी डोळे उघडले असून त्या डॉक्टरांशीही बोलत आहेत. करोनामुळे त्या थोड्या अशक्त झाल्या आहेत, पण आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.'

No comments:

Post a Comment