शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून धुळ्यात वाद;
धुळे जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या स्थापनेवरून वाद निर्माण झालाय. पोलिसांनी पुतळा हटवण्यास सांगितला. यावरून शिवप्रेमी आक्रमक झाले. ग्रामस्थांनीसुद्धा विरोध दर्शवला. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या परिस्थितीत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. धुळ्याच्या धनुर गावामध्ये हा प्रकार घडला असून, त्यामुळे आता परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
तीन हजार लोकसंख्येचे धनूर गाव आहे. शेतीवर अर्थकारण असलेल्या या गावात शुक्रवारी (18 फेब्रुवारी) मध्यरात्रीनंतर काही अज्ञात व्यक्तींनी अश्वारूढ शिवरायांचा पुर्णाकती पुतळा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी उभारला. हा प्रकार शनिवारी सकाळी महसूल व पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुतळा समितीच स्थापना व विविध शासकीय परवानगी घेतल्यानंतर पुतळा उभारणीला मंजूर दिली जात असते. परंतु, धनूर येथे विनापरवानगी छत्रपती शिवारायांचा पुतळा उभारण्यात आला. यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह महसूल व पोलिस प्रशासनाचा फौजफाटा शनिवारी सकाळी धनूर येथे दाखल झाला.
राज्यात काल मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. धुळ्यातही मोठ्या जल्लोषात शिवजयंती झाली. त्यानंतर आता जिल्ह्यातील धनुर गावात तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. गावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती, मात्र बेकायदेशीररित्या या पुतळ्याची स्थापना करण्यात आल्याचं सांगत पोलिसांनी पुतळा काढण्यास सांगितलं आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना विरोध केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
No comments:
Post a Comment