मुस्लीम विद्यार्थिनींना दिलासा नाहीच; 'हिजाब'ला कोर्टानं परवानगी नाकारली - latur saptrang

Breaking

Tuesday, February 22, 2022

मुस्लीम विद्यार्थिनींना दिलासा नाहीच; 'हिजाब'ला कोर्टानं परवानगी नाकारली



मुस्लीम विद्यार्थिनींना दिलासा नाहीच; 'हिजाब'ला कोर्टानं परवानगी नाकारली


बंगळुरू : कर्नाटकातील (Karnataka) महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिनींच्या (Muslim Student) हिजाब घालण्यावरून चांगलाच वाद रंगलाय. महाविद्यालयीन प्रशासनाकडून विद्यार्थिनींच्या पेहरावाबाबत करण्यात आलेल्या कडक सक्तीमुळं आरोप-प्रत्यारोपही सुरु आहेत. दरम्यान, हिजाब प्रकरणी (Hijab Controversy) सुनावणी करत असलेल्या कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिलाय. उडुपीच्या भंडारकर कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या (Bhandarkar College) दोन विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती. मात्र, कोर्टानं स्पष्ट नकार दिलाय.

याचिकाकर्ते बीबीएचे विद्यार्थी आहेत. या याचिकेत म्हटलंय की, महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून आतापर्यंत नियमितपणे महाविद्यालयीन गणवेशासह हिजाब परिधान करत आहोत. तसेच कॉलेजच्या नियमावली पुस्तकातही हिजाब घालण्याची परवानगी दिली गेलीय, असंही याचिकेत नमूद केलंय.

दोन्ही विद्यार्थिनींच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णसिंह दीक्षित (Justice Krishna Singh Dixit) यांनी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. खंडपीठानं म्हटलंय की, 10 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी अंतरिम आदेश जारी केला होता. त्यामुळं खंडपीठाकडून कोणताही दिलासा देता येणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलंय. दरम्यान, हिजाबच्या वादावरून कर्नाटकात निदर्शनं तीव्र झाल्यानंतर आणि काही ठिकाणी हिंसाचार उसळल्यानंतर सरकारने 16 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टानंही हिजाब वादासंदर्भात दाखल याचिका प्रलंबित होईपर्यंत अंतरिम आदेश दिला होता.

No comments:

Post a Comment