लातूर-तिरुपती रेल्वेचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे खा.सुधाकरराव शृंगारे यांच्या प्रयत्नांना यश - latur saptrang

Breaking

Friday, February 4, 2022

लातूर-तिरुपती रेल्वेचा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे खा.सुधाकरराव शृंगारे यांच्या प्रयत्नांना यश





  लातूर/प्रतिनिधी:अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या लातूर ते तिरुपती या रेल्वेचा प्रस्ताव मध्य रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठवला आहे.खा. सुधाकरराव शृंगारे यांनी ही रेल्वे सुरू करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
   लातूरसह मराठवाड्यातील भक्तांसाठी गरजेची असणारी लातूर ते तिरुपती रेल्वे सुरू करण्यासाठी खा.सुधाकरराव शृंगारे यांनी प्रारंभी पासूनच पाठपुरावा केला आहे.मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकां सोबत कांही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही त्यांनी हा विषय मांडला होता. त्यामुळे मध्य रेल्वेने हा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वेकडे पाठवला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य शामसुंदर मानधना यांनी दिली. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी खा.शृंगारे यांच्या सूचनेनुसार आपण सिकंदराबाद येथे महाप्रबंधकांची व परिचालन अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती.त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता,असे ते म्हणाले.
  खा.सुधाकरराव शृंगारे यांनी रेल्वे संदर्भातील मागण्यांचा वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.त्यातील बहुतांश मागण्या मार्गी लागल्या असल्याचेही मानधना म्हणाले.
    मुंबई-लातूर व मुंबई-बिदर या गाड्यांसाठी ६ बोगी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. परंतु मुंबई व पुणे येथे ज्या प्लॅटफॉर्मवरून ही गाडी सुटते त्याची लांबी कमी आहे.त्यासाठी मुबंईच्या ईतर मोठया प्लॅटफॉर्म वरून व पुण्याच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून गाडी मार्गस्थ करावी,अशी मागणी खा.शृंगारे यांनी केली असता तांत्रिक पाहणी करून निर्णय घेऊ,असे आश्वासन महाप्रबंधकांनी खा.शृंगारे यांना दिल्याचे ते म्हणाले.
   मुंबईत चार ते पाच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली असल्याचे तसेच लातूर, उस्मानाबाद व बार्शी येथील दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी यापूर्वीच वाढविण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.
    गुलबर्गा-लातूर व गुलबर्गा- लातूररोड या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाला असून मध्य रेल्वेने त्याचा डीपीआर अद्याप रेल्वे बोर्डाला पाठवलेला नाही.मार्च २०२२ पर्यंत तो पाठवला जाण्याची शक्यता असून त्यानंतर या संदर्भात निर्णय होणार असल्याचे मानधना यांनी सांगितले.
   कोविड काळात बंद करण्यात आलेली मिरज- परळी ही गाडी सुरू करण्याचे आश्वासन महाप्रबंधकांनी दिले आहे. अमरावती-लातूर-पुणे ही गाडी देखील कोविडपासून बंद आहे.ती चालू करण्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. नांदेड-पनवेल ही गाडी पनवेल येथे थांबून असते. त्याचा लूज टाईम कमी करून ती रत्नागिरीपर्यंत वाढवावी यासाठी कोकण रेल्वेला प्रस्ताव पाठवण्याची विनंती खा.सुधाकरराव शृंगारे यांनी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
  सोलापूरहुन कुर्डूवाडी मार्गे लातूरला येण्यासाठी इंजिन बदलावे लागते.ते टाळण्यासाठी कॉडलाईन अर्थात बायपास प्रस्तावित आहे.त्याचाही डीपीआर ३० जून पर्यंत पाठविला जाईल असे मध्य रेल्वेने कळवले आहे.कुर्डूवाडी-लातूर ते लातूर रोड या १८० किलोमीटर मार्गाच्या दुहेरी करणाचे सर्वेक्षण तीन वर्षांपूर्वी झालेले आहे. अद्याप त्याचा डीपीआर पाठवला नसून तो मार्च २०२२ पर्यंत पाठवण्याचे आश्वासन महाप्रबंधकांनी खासदारांना दिले असल्याचे ते म्हणाले.
   मानधना यांनी सांगितले की,हैदराबाद-हडपसर ही रेल्वे हडपसर पर्यंतच सोडण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची बाब खा.शृंगारे यांनी निदर्शनास आणून दिली.ही रेल्वे पुण्यापर्यंत विस्तारित करावी किंवा पुणे मार्गे पुढील स्थानकापर्यंत चालवावी अशी मागणीही त्यांनी केली होती.
कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर या साप्ताहिक रेल्वेला लातूर रोड येथे फक्त ऑपरेटिंग स्टॉप होता.गाडी थांबली तरी प्रवाशांना चढण्या- उतरण्याची सोय नव्हती.या स्थानकाचे तिकीट अथवा आरक्षण मिळत नव्हते.हा ऑपरेटिंग स्टॉप कमर्शिअल मध्ये रूपांतरित करण्याची खा.शृंगारे यांची मागणी रेल्वेने मान्य केली असून आता प्रवाशांना या स्थानकावरून तिकीट व आरक्षण मिळणे सुरू झाले आहे.
   एक वर्षापासून सुरू असणाऱ्या या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.तिकीटासाठी एक महिन्याची प्रतीक्षा आहे.त्यामुळे या रेल्वेला ४ बोगी वाढविण्याचा प्रस्ताव खा.सुधाकरराव शृंगारे यांनी दिला असून त्यालाही महाप्रबंधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असल्याचेही मानधना म्हणाले.पंढरपूर- लातूर-नांदेड या नवीन गाडीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून तसा प्रस्ताव दक्षिण मध्य रेल्वे कडे पाठवलेला आहे.
  खा.सुधाकरराव शृंगारे यांनी वेळोवेळी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लातूर येथून विविध रेल्वे सुरू करण्यासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.त्यामुळे भविष्यात लातूर येथून अनेक गाड्या सुरू होणार असून याचा प्रवाशांना लाभ होणार असल्याचेही शामसुंदर मानधना यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment