सरकारणे मानवी जिवणास व्यसनाधिन करु नये - हनिफ शेख
अहमदपूर प्रतिनीधी
महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीस परवानगी दिली असुन हा निर्णय माणवी जिवनासाठी धोका निर्माण करणारा असुन मध्य प्राशन केल्यांने कोणाचेही भले होणार नाही हे अलिखीत सत्य आहे.लोकांना व्यसन मुक्ती चा मार्ग दाखवणे वा तसे कायदे बनविने गरजेचे असताना महाराष्ट्र सरकारने वाईन खरेदी साठी खुप मोठी सुट या निर्णयातुन दिलेली असुन हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावे असे निवेदन न्यासचे जिल्हाध्यक्ष हनिफ भाई शेख यांच्या नेत्रवात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
लोकांना व्यसन मुक्त करण्याचे धोरण हाती घेणे ही काळाची गरज असुन युवा विडी ही व्यसनाधिक होत चाललेले असुन सरकारने सक्तीचे कायदे बनविणे गरजेचे असताना केवल सरकारची तिजोरी भरावी या साठी हे चुकीचे धोरण अवलंबीले असुन पद्मश्री अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास च्या वतिने सबंध महाराष्ट्र भर या निर्नया विरूद्ध निवेदणे देण्यात येत असुन दि.०४ फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी अहमदपूर, तहसीलदार अहमदपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी न्यासचे जिल्हा अध्यक्ष हनिफ शेख न्यासचे सचिव बासिदखान पठाण माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थ कुमार सुर्यवंशी, न्यासचे तालुका अध्यक्ष सुनिल देशमुख सर,सामाजीक कार्यकर्ते प्रशांत जाभाडे,सामाजिक कार्यकर्ते ईम्रोज पटवेगर,उत्कर्ष शिंदे,असलम शेख,प्रा.सादिक शेख आंदीची उपस्थिती होती.
वास्तविक पहाता संविधानानुसार लोकांना व्यसनापासून , अंमली पदार्थापासून , मद्यापासून परावृत्त करणे , तसा प्रचार प्रसार आणि लोकशिक्षण लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे . असे असतानाही केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला रान मोकळे करून देणारा निर्णय असुन लोकांच्या जिवीतास हाणी करणार कायदा तात्काळ रद्ध करण्यात यावा असे निवेदनात नमुद करण्यात आले असुन असे न झाल्यास अण्णांच्या नेत्रत्वात सबंध जिल्हाभर आंदोलने करण्यात येतील असा ईशारा देण्यात आला आहे.
Thanks
ReplyDelete