कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम गणवेश वाटप, कोव्हिड लसीकरण शिबिर आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जियारत. - latur saptrang

Breaking

Friday, February 4, 2022

कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम गणवेश वाटप, कोव्हिड लसीकरण शिबिर आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जियारत.






 कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दिवंगत अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम गणवेश वाटप, कोव्हिड लसीकरण शिबिर आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने जियारत.


औसा (म. मुस्लिम कबीर / मुख्तार अहेमद मणियारी) औसा चे माजी नगराध्यक्ष दिवंगत अ‍ॅड.मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंती निमित्त शहरात विविध संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सकाळी हजरत शाह खाकी रह. यांच्या मझार वर चादर अर्पण करून याच आवारात असलेल्या दिवंगत अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल यांच्या कबरी वर फुलांची चादर अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, शहराध्यक्ष शकील शेख, नगर सेवक अंगद कांबळे, जयराज कसबे आदम खान पठाण, अहमद भाई शेख, वहीद कुरेशी, खुंदमीर मुल्ला, हाजी छोटे भाई, ओवेस अहमद सिद्दीकी, गुलाब शेख, शफीउद्दीन पटेल, अ‍ॅड. समीउद्दीन पटेल उपस्थित होते. मौलाना कारी रफिक सीराजी आणि मौलाना अमजद सिद्दीकी यांनी दिवंगतांसाठी प्रार्थना केली. राहत मेडिकल फाऊंडेशन, सा. लातूर रिपोर्टर, अ‍ॅड. मुजिबोद्दीन पटेल विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने राहत क्लिनिक, उदय पेट्रोल पंपाशेजारी, मेन रोड, औसा येथे दि.०३ फेब्रुवारी २०२२ वार गुरुवार रोजी सकाळी १० ते २ या वेळेत कोव्हिड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव मॅडम, श्रीमती वांगे सिस्टर, श्री मुदगडे व श्री भिसे सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत अ‍ॅड. समीउद्दीन पटेल यांनी केले. या शिबिरामध्ये ५२ नागरिकांनी कोव्हिड लसीकरणाचा लाभ घेतला. या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी माजी नगराध्यक्ष सुनील मिटकरी,काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापूरे, मौलाना कलिमुल्लाह कादरी, कारी रफिक सिराजि, शहराध्यक्ष शकील शेख, नगर सेवक अंगद कांबळे, जयराज कसबे आदम खान पठाण, अहमद भाई शेख, खुदमीर मुल्ला, हाजी छोटे भाई, शफीउद्दीन पटेल, इस्माईल सरगुरु, अब्दुल गनी सर, राजेंद्र बनसोडे, पत्रकार मुख्तार अहेमद मणियारी, इलियास चौधरी, शमशुल हक काझी, आसिफ पटेल, बी. जी. शेख, राम कांबळे, आफताब शेख, मिस्बा पटेल, अजहर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. या या शिबिराच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. इकबाल शेख, पत्रकार मजहर पटेल, राहत फाऊंडेशनचे अरबाज शेख आसेफ शेख यांनी परीश्रम घेतले. यावेळी अ‍ॅड. समीउद्दीन पटेल, मुख्याध्यापक शफीउद्दीन पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार पत्रकार म. मुस्लिम कबीर यांनी मानले.

तसेच हजरत सुरत शाह उर्दू प्राथमिक व हायस्कूल औसा येथील फखरुद्दीन अली अहमद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिवंगत अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त सुमारे १५५ विद्यार्थ्यांना हाजी छोटे मियाँ, कारी रफिक सराजी, हाजी अहमद शेख, अ‍ॅड. समिउदीन पटेल, हाजी आदम खान पठाण, वहीद कुरेशी, गुलाब भाई शेख यांच्या हस्ते शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी कारी मुहम्मद रफिक सीराजी म्हणाले की, दिवंगत अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल हे स्वतः एक संघटना होते. त्यांच्यात नम्रता भरलेली होती. सामाजिक व राजकीय जाणिवेसोबतच धार्मिक ध्यासही त्यांच्या मध्ये होता. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अमर खानापुरे म्हणाले की,दिवंगत वकिल साहेब आपल्या विविध गुणांच्या जोरावर राजकारणात आपले अस्तित्व निर्माण केले होते,ज्याचा फायदा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना झाला. विलासराव देशमुख विचार मंचचे अध्यक्ष खुदमीर मुल्ला यांनी औसा येथील औसा नगरपालिका सांस्कृतिक सभागृहाला 'कै अ‍ॅड. मुजीबोद्दीन पटेल कल्चरल हॉल' असे नामकरण करण्याचा ठराव मांडला, त्याला सर्व उपस्थितांनी मान्यता दिली. लगेच सर्व मान्यवरांनी नगर परिषदेत जावून मुख्याधिकारी श्रीमती वसूधा फड यांना भेटून निवेदन सादर करून मागणी केली.

No comments:

Post a Comment