महाविकासआघाडीने वाईनविषयी घेतलेला निर्णय येणाऱ्या पिढीसाठी हानीकारक आहे असे म्हणत समाजसेवक अण्णा हजारेंनी पत्र लिहले आहे. आण्णा हजारेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पत्र लिहिले आहे. महाविकासआघाडी सरकारने निर्णय मागे घ्यावा अन्यथा उपोषणाला बसेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांनी दिला आहे.
आण्णा हजारेंनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मॉलमध्ये वाईन विक्रीस ठेवण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. वाईन माॅलमध्ये विक्रिस ठेवण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषणाला बसेल अशा आशयाचे पत्र आण्णा हजारे यांनी लिहले आहे. आण्णा हजारे यांनी हे पत्र ३ फेब्रुवारीला लिहले होते. पण अजून मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर या पत्राला देण्यात आलेले नाही. त्यामुळे आण्णा हजारे यांनी आणखी एक पत्र सरकारला लिहल आहे. आण्णा हजारे वाईन सुपर मार्केट मध्ये उपलब्ध करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आण्णा हजारे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment