ष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेताल. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही शिवाजी पार्कवर उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर दाखल
- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेता शाहरुख खान शिवाजी पार्कवर दाखल
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही शिवाजी पार्कवर उपस्थित
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल
- अभिनेता शाहरुख खान शिवाजी पार्कवर दाखल
- आदिनाथ मंगेशकर ( हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव) लता दिदींना अग्नी देणार
- ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान अंत्यविधी पार पडतील. मानवंदना आणि त्यांनतर मंत्राग्नी विधी होईल. आठ भटजी विधी पार पाडणार: भटजी प्रशांत फळसाणकर
- लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची शिवाजी पार्क इथं मोठी गर्दी
- लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल
- लतादीदींना पोलिसांकडून मानवंदना; पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना
- लतादीदींचं पार्थिव प्रभूकुंजच्या बाहेर, पोलिसांकडून मानवंदना
- पोलिसांचं पथक दीदींच्या निवासस्थानी; थोड्याच वेळात देण्यात येणार मानवंदना
- लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दुखवटा म्हणून राज्य सरकारकडून सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंजवर
- आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शिवाजी पार्क इथं केली अंत्यविधीच्या व्यवस्थेची पाहणी
- लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अमिताभ बच्चन 'प्रभूकुंज'वर , मुलगी श्वेतही आहे सोबत
- मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला
- सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया
शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त;१० हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात
- अनेक नेतेमंडळी आणि बॉलिवूड कलाकार 'प्रभूकुंज'वर दाखल
- लतादीदींचे पार्थिव त्यांचे निवासस्थान 'प्रभूकुंज'वर दाखल
- अभिनेता सलमान खान यानं वाहिली लतादीदींना श्रद्धांजली
- अभिनेत्री माधुरी दीक्षितनं शेअर केल्या लता दीदींसोबतच्या खास आठवणी
- क्रिकेटपटू विराट कोहलीनं वाहिली लता दीदींना श्रद्धांजली
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले
- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचला
- अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिला लता दीदींसोबतच्या आठणींना उजाळा
- बॉलिवड दिग्दर्शक मधुर भंडारकर यांनी वाहिली लता दीदींना श्रद्धांजली
- चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही, लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील: पंकजा मुंडे
- लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला
- लता दीदींवर अंत्यसंस्कार होणार असल्यानं इथल्याचोख व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्क इथं दाखल
- लता दीदींच्या अंत्यदर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल
- शिवाजी पार्कइथं दीदींवर संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं दिले महत्त्वाचे निर्देश
- लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दुपारी साडेचार नंतर मुंबईमध्ये दाखल होणार
- इतक्या असंख्य गाण्यांमधून आपल्या स्वर्गीय सुरामधून लताबाई त्यांचा श्वासच तर सोडून गेल्या आहेत. मग त्या गेल्या असं म्हणायचं तरी कसं? अशा शब्दांत संगितकार कौशल इनामदार यांनी भावना व्यक्त केल्या
- निधनाची सर्वप्रथम माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली
- लतादीदींचं पार्थिव १२ ते १२.३०वाजण्याच्या दरम्यान ब्रिच कँडी रुग्णालयातून 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार
- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
- लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या
- संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली
- आज देशानं केवळ आवाज नव्हे तर भारतीय संगीतानं आत्मा गमावला: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
- लता दीदींच्या सुरांनी श्रीमंत केलं; आरती अंकलीकर टिकेकर यांची प्रतिक्रिया
- दीदींच्या निधनानं अवघा देश शोकाकुल
- भारताचा आवाज हरपला; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली श्रद्धांजली
- दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
- दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभमीत अंत्यसंस्कार होणार
- अभिनेता अक्षय कुमारनं वाहिली लता दीदींना श्रद्धांजली
- युग संपले..लता दीदींच्या निधनानानंतर खासदार संजय राऊत यांचे ट्विट
- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोशल मीडियाद्वारे वाहिली श्रद्धांजली
- लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
No comments:
Post a Comment