'बर्दाश्त हमने किया है; बरबाद भी हम करेंगे' राऊतांचं भाजपला आव्हान
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याचे पुरावे ते लवकरच देणार असल्याचं स्पष्ट केलंय. यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन भाजपचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना भवनात ही परिषद होणार आहे, असं ते म्हणाले. (Sanjay Raut Speaks on BJP)
आम्ही काय बोलतो हे संपूर्ण देश ऐकणार आहे. हमने बहोत बरदाश किया है, तो हम ही बरबाद करेंगे, असा चिमटा त्यांनी काढला आहे. शिवसेनेचे खासदार आमदार आणि बडे नेते शिवसेना भवनात उपस्थित असणार आहेत, असं राऊत म्हणाले. ठाकरे परिवार आणि शिवसेनेच्या ज्या नेत्यांवरर चिखल उडवला जात आहे, त्या सगळ्यांना उत्तरं देणार आहे. केंद्रीय यंत्रणांची शिवसेनेवर सुरू असलेल्या दादागिरीला उत्तर देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं.
No comments:
Post a Comment