शंकर शृंगारे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड - latur saptrang

Breaking

Monday, February 14, 2022

शंकर शृंगारे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड







 शंकर शृंगारे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड


लातूर : लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांचे पुत्र शंकर शृंगारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष  ज्ञानेश्वर चेवले यांनी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा संघटन सरचिटणीसपदी निवड केली आहे, असे  नियुक्तीपत्र माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शंकर शृंगारे यांना देण्यात आले आहे.


जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांनी पुढाकार घेतला होता, असंख्य नागरिक त्यांच्याकडे समस्या घेऊन येतात.

 या समस्या सोडविण्याचा प्रयत्न शंकर शृंगारे यांनी केला आहे.


 व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून ही आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकारण त्यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात मुरूड मध्ये गोरगरिबांना अन्नधान्याचे मोफत वाटप ही त्यांनी केला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने त्यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करून त्यांचा  सन्मान केलेला आहे.


 या निवडीवेळी जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

या निवडीबद्दल लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर तसेच भारतीय जनता पार्टीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment