आयुर्वेदाप्रमाणेच युनानी देखील प्राचीन आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे:- डॉ. मोहसिन देशमुख - latur saptrang

Breaking

Monday, February 14, 2022

आयुर्वेदाप्रमाणेच युनानी देखील प्राचीन आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे:- डॉ. मोहसिन देशमुख



 आयुर्वेदाप्रमाणेच युनानी देखील प्राचीन आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे:- डॉ. मोहसिन देशमुख


मुरुड ,प्रतिनिधी :- दि. 11 फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक युनानी दिवस साजरा करण्यात आला. 


 हा दिवस जागतिक युनानी दिन साजरा केला जातो. श्रेष्ठ युनानी विद्वान आणि समाज सुधारक हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

युनानी औषधोपचारांच्या रोगप्रतिबंधक आणि रोगनाशक गुणधर्माविषयी जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वसीम सय्यद (आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी)तेव्हा ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे राबवल्या जाणाऱ्या आयुष मिशन आणि त्यात अंतर्भूत आयुर्वेद, युनानी, योगा, होमिओपॅथी इतर चिकित्सा प्रणालींची महिती दिली याप्रसंगी महत्वपूर्ण ते बोलत होते.


तसेच डॉ. मोहसिन देशमुख (युनानी वैद्यकीय अधिकारी) म्हणाले की,

राष्ट्रीय सभेचे माजी अध्यक्ष , संविधान सभेचे सदस्य हकीम अजमल खान यांचा जन्मदिवस जागतिक युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो. अजमल खान यांनी जमिया मिलिया इस्लामीया विद्यापीठाची स्थापना केली ,तसेच भारतात युनानी वैद्यकीय शिक्षण ची मुहूर्तमेढ रोवली. आयुर्वेदाप्रमाणेच युनानी देखील प्राचीन आणि पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे. विविध जुनाट आजारामध्ये ही चिकित्सा प्रणाली यशस्वी ठरली आहे. युनानी पद्धतीची हिजामा (cupping थेरपी) लोकप्रिय झाली आहे.अशा विविध विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्यांचे आभार डॉ.तिरुमल माळी (होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी) यांनी मानले.

 

यावेळी कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉ.शेळके मॅडम तसेच स्टाफ नर्स आंतरवासिता प्रशिक्षणार्थी आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते

No comments:

Post a Comment