पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कराल तर खबरदार - डी. टी. आंबेगावे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न - latur saptrang

Breaking

Monday, February 14, 2022

पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कराल तर खबरदार - डी. टी. आंबेगावे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न





 पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल कराल तर खबरदार - डी. टी. आंबेगावे


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न


लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, संघाचे पदाधिकारी नितीन हांडे, सौ. मेघा पाटील, प्रतिक्षा पिटले, निकिता पिटलवार, सूरज मद्देवाड, विवेक मुळजे, फिरोज मुजावर येजाज पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे म्हणाले की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नाही. पत्रकारांवर कोणी खोटे गुन्हे दाखल करीत असाल तर खबरदार असा इशारा दिला आहे. तसेच पत्रकारांच्या संदर्भात विनाकारण कोणी अपशब्द उच्चारत असेल किंवा धमकी देत असेल तर कदापिही त्यांना माफ केले जाणार नाही असा विश्वास दिला. महिला राज्याध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांनी महाराष्ट्रातील महिला पत्रकार संघासोबत मोठ्या प्रमाणावर जोडणार असल्याचे सांगितले. मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांची असल्याने सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याची उज्जवल परंपरा सांगून लातूर जिल्हा कार्यकारिणी उत्कृष्ट कार्य करीत असून असेच कार्य कायम करणार असल्याचे सांगितले. जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे यांनी आठवड्यातून एक दिवस लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कार्यकारिणीला भेट देऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचा एकमताने ठराव मंजूर केला. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, लातूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment