अखेर हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश, पण...
बंगळुरू : कर्नाटकमधील उडपीमध्ये हिजाबवरून (Karanataka Hijab Row) वातावरण तापलं आहे. हिजाब घातलेल्या मुलींना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे. त्याविरोधात काँग्रेसने आंदोलन देखील केले. अखेर विद्यार्थिंनींना एका महाविद्यालयात हिजाब घालून येण्याची परवानगी दिली. पण, त्यातही अटी घालण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून उडपी येथील महाविद्यालयांमध्ये हिजाब घातलेल्या विद्यार्थिंनींना प्रवेश नाकारला जातोय. त्याविरोधात काही मुस्लीम संघटना आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी आंदोलन देखील केले. पण या विद्यार्थिनी हिजाब घालून आल्या तर हिंदूंच्या विद्यार्थिनी भगवे दुप्पटे घेऊन शाळेत जातील, अशी भूमिका हिंदू संघटनांनी घेतली आहे. पण, प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेच्या गणवेशात यावं, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गणवेशाच्या रंगाचा हिजाब घालण्यास मुलींनी तयारी दर्शवली आहे. पण, त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जात आहे.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय विद्यार्थ्यांना हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment